तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

अमरावती : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी व विक्रीप्रकरणी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासानंतर हा गैरकारभार उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे.

विविध राज्यांतून चोरण्यात आलेले ट्रक, ट्रेलरच्या चेसिस व इंजिन क्रमांकात फेरबदल करून व त्यांची परराज्यात नोंदणी करून विक्री केली जात होती. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण ५ कोटी ५० लाख रुपये किमतीची २९ वाहने जप्त केली आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय‍क परिवहन अधिकारी भाग्‍यश्री पाटील (४३), मोटार निरीक्षक गणेश वरूठे (३५) आणि सहायक मोटार निरीक्षक सिद्धार्थ ठोके (३५) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या अधिकाऱ्यांची नावे आहेत. नोंदणीसाठी आलेल्‍या वाहनांची प्रत्‍यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्‍या वाहनांची नोंदणी करणे या अधिकाऱ्यांना भोवले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें