गोरेगाव◼️ जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी घटना घडली असून गोरेगाव तहसिलदार के.के.भदाणे यांच्या सह याच कार्यालयातील नायब तहसिलदार व कर्मचारी यांच्यासह सुमारे ४-५ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.सदर प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे एसीबीच्यावतीने कळविण्यात आले आहे.









