मुल्ला PHC समोर बस थांब्याची तात्काळ व्यवस्था करा
देवरीः तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र मुल्ला येथे औषधोपचारासाठी ये-जा करणार्यांना त्रास होत असून आरोग्यवर्धिनी केंद्राजवळ तात्काळ बस थांब्याची व्यवस्था करावी, असे पत्र आ. सहसराम कोरेटे यांनी गोंदिया व साकोली बस आगार व्यवस्थापक दिले आहे. आमगाव-देवरी राज्यमार्गावर मुल्ला येथे आरोग्यवर्धिनी केंद्र स्थित आहे. परिसरातील जवळपास 50 हून अधिक गावचे नागरीक या आरोग्यवर्धिनी केंद्रात औषध उपचारासाठी ये-जा करतात.
मात्र आरोग्यवर्धिनी केंद्राजवळ बस थांबा नसल्याने रुग्ण व प्रवाशांना मोठा त्रास होतो. बस थांबा आरोग्यवर्धिनी केंद्राजवळ नसल्याचे बोलून वाहन व चालक प्रवाशांना उतरविण्यात नकार देतात. यामुळे प्रवाशांना मुल्ला गावच्या बस थांब्यापासून तासभर जागा पायी चालावे लागते. त्यामुळे मुल्ला आरोग्यवर्धिनी केंद्राजवळ तात्काळ बस थांब्याची व्यवस्था करण्याचे पत्र आ. कोरोटे यांनी आगार व्यवस्थापकांना दिले आहे.