चालत्या लक्झरी बसच्या खिडकीतुन उडी घेणाऱ्या इसमाचा देवरी येथे मृत्यू

देवरी २९ः प्रकरण अशा प्रकारे आहे की, फिर्यादी निलमकुमार दुर्योधन मडावी, वय २९ वर्षे, रा. घुपसाल, ता. छुरीया, जि. राजनांदगांव व मृतक गुपेंद्र भगत मडावी, हे दिनांक २७/११/२०२२ रोजी हैद्राबाद येथुन जनता लक्झरी बसने येत असता दिनांक २८/११ / २०२२ रोजी सकाळी ०४:०० वा. दरम्यान गुपेंद्र भगत मडावी, हा डिप्रेशन मध्ये जावुन त्याने चालत्या लक्झरी बसमधुन खिडकीतुन उडी घेवुन स्वतः जखमी होवुन तो उपचारा दरम्यान ग्रामीण रूग्णालय देवरी येथे मरण पावल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे देवरी येथे अकस्मात मृत्यु क. ३१/२०२२ कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी पोहवा / १२६० वसंता देसाई, पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Share