गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
Gondia : मुंबई शहर येथे आंतकवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार , तसेच निष्पाप नागरिक व विदेशी नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता दिनांक २६/११/२०२२ रोजी वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रक्तदान शिबीर स्थळ खालील प्रमाणे—
१ ) जिल्हा वाहतूक शाखा, जयस्तंभ चौक, गोंदिया
२) उप-मुख्यालय देवरी,
३) पोलीस स्टेशन आमगाव
४) पोलीस स्टेशन तिरोडा
१) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याकरिता सर्व तांत्रिक उपकरणे, डॉक्टर, सहाय्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
२) रक्तदान देणाऱ्या पोलीस अधिकारी / अंमलदार, प्रतिष्ठीत व्यक्ति, तरुण तरुणी मंडळी व नागरिक यांना जर रक्ताची गरज भासली तर त्यांच्याकडुन एक वर्षाचे वैध डोनर कार्ड देण्यात येणार असुन एक वर्षापर्यंत रक्त पुरविण्यात येणार आहे.
३) पोलीस अधिकारी / अंमलदार प्रतिष्ठीत व्यक्ति, संपादक तरुण तरुणी मंडळी व नागरिकांचे कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास दिलेल्या एक वर्षाचे वैध डोनर कार्ड मध्ये सवलतीच्या दराने रक्त पुरविण्यात येणार आहे.
४) रक्तदान शिबीराच्या दिवशी रक्तदान दात्यास हल्दीराम फरसाण, स्विट, गिफ्ट आहेत. म्हणुन टिफीन बॉक्स व सर्टिफिकेट देणार आहेत.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होणार आहेत. तथापि लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता प्रतिष्ठीत व्यक्ति, तरुण तरुणी मंडळी व इतर नागरिक यांनी मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होवुन सहकार्य करावे असे गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.