मैं नहीं तो कौन बे’; राऊतांना जामीन मिळताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी जामीन मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने जामीन दिल्यानंतर आता संजय राऊत यांचा जेलबाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे.

100 दिवस संजय राऊत हे जेलमध्ये होते. पीएमएलए कोर्टाने दिलेल्या जामिनाविरोधात ईडीने हायकोर्टातही धाव घेतली, पण हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय योग्य ठरवला. अखेर राऊत 100 दिवसांनंतर जेलमधून बाहेर येणार आहेत.

आज ट्विटरवर संजय राऊत यांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आलाय. मिम्स तर एकसे बढकर एक आहेत. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, टायगर इज बॅक, ‘मैं नहीं तो कौन बे’ अशा अनेक घोषणा, गाणी शेअर करण्यात येत आहेत.

#sanjayraut हा हॅशटॉग देखील ट्विटर, फेसबूकवर ट्रेड करताना दिसतोय. एका युझरने अब आयेगा मझा, फायनली टायगर इज बॅक असं म्हणत संजय राऊत यांचा हातात बॅट घेतलेला फोटो ट्विट केला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें