‘सुपर 23’ च्या संकल्पनेतून देवरी दसरा महोत्सव थाटात संपन्न

◼️ सुपर 23 ग्रुपने प्रायोजित केलेला दसरा महोत्सव ठरला संस्मरणीय

प्रा. डॉ. सुजित टेटे

देवरी 06: दसरा उत्सव समितीचा दसरा महोत्सव थाटात संपन्न झाला असून 51 फुटाचा आकर्षक रावणाच्या पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. दसरा निमित्ताने भव्य शोभा यात्रा धुकेश्वरी मंदिरापासून ते क्रीडांगणापर्यंत काढण्यात आली असून आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देखील देवरी करांनी अनुभवली. यावेळी लोकांच्या मनोरंजनासाठी नागपूर येथील नृत्यकलाकारांनी नृत्य प्रदर्शन केले आणि लोकांचे मने जिंकली. देवरीवासीयांसाठी भव्य L E D स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली असून आकर्षक लंकादहन देखावा तयार करण्यात आला होता.

सदर दसरा उत्सव समिती दरवर्षी हा सण साजरा करीत असून यामध्ये खालील सदस्यांचा मोलाचा सहकार्य असतो.

१) आफ़ताब शेख़
२) पारस कटकवार
३) शेंकी भाटिया
४) हमीद मेमन
५)अर्पित जैन
६) रतनेश असाटि
७) काक्के भाटिया
८) अंशुल अग्रवाल
९) गोपाल तिवारी
१०) शूरेश साहु
११) राजेश साहु
१२) युवराज मेश्राम
१३) प्रवीण दहिकर
१४) विजय गहाने
१५) सचिन बावरिया
१६) रितेश अग्रवाल
१७) भूषण मस्करे
१८) अमित गुप्ता
१९) अनिल येरणे
२०) पुष्पकुमार गांगबोईर
२१) आशीष अंबिलकर
२२) यादव पंचमवार
२३) विनोद गभने

यांच्या संकल्पनेतून दसरा उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला असून हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट मांडून पुजा केली जाते यास घटस्थापना असे म्हणतात. घट 9 दिवसाचे असून यास नवरात्र असे म्हणतात. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

Share