सभापती अंबिका बंजार आदिवासी विकास विभागाच्या आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित
देवरी 06: महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिशक्ती सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला असून devriq पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार यांचा आदिवासी विकास विभागाच्या आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष रविंद्र ठाकरे, भा.प्र.से., अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर प्रमुख अतिथी मायाताई इवनाते, माजी महापौर तथा माजी सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, विशेष उपस्थिती बबीता गिरी, सह आयुक्त,अनुसूचित जमाती प्रमाणत्र तपासणी समिती, नागपूर, प्रा. सुमित्रा टेकाम, रेखा जुगनाके से.नि. प्राध्यापीका, संध्या किलनाके, शिक्षीका, रत्नाबाई विद्यालय, वर्धा सहाय्यक अभियंता, दुरदर्शन, नागपूर यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम दिनांक – ०४/१०/२०२२ दुपारी १२.३० वसंतराव नाईक, राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनामती), नागपूर येथे संपन्न झाला.
यावेळी दशरथ कुळमेथे उपायुक्त, आदिवासी विकास, नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. अंबिका बंजार यांचे त्यांचे आप्त परिवार, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.