देवरी दसरा उत्सवाची जय्यत तयारी 51 फुटाचा रावणाचा पुतळा तयार

देवरी 04: दसरा उत्सव समितीची जय्यत तयारी सुरु असून 51 फुटाचा आकर्षक रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. दसरा निमित्ताने भव्य शोभा यात्रा धुकेश्वरी मंदिरापासून ते क्रीडांगणापर्यंत काढण्यात येणार असून आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देवरावाशीयांना अनुभवायास मिळणार आहे. यावेळी मनोरंजनासाठी नागपूर येथील नृत्यकलाकार प्रदर्शन करणार असल्याचे समितीने सांगितले. देवरावासीयांसाठी भव्य L E D स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली असून आकर्षक लंकादहन देखावा तयार करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share