देवरी येथील रुद्रा ट्रेडर्सला भीषण आग , भव्य सेल जळून खाक

देवरी 16: चिचगड रोड परिसरातील एच पी गॅस एजेन्सी मागील रुद्रा ट्रेडर्स प्लास्टिक वस्तूच्या सेल ला भीषण आग लागली असून संपूर्ण सेल जाळून खाल झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

राजा मिश्रा यांच्या मालकीची रुद्रा ट्रेडर्स सेल आगीत स्वाहा झाली असून सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. वेळीच देवरी येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला परंतु सर्व प्लास्टिक सेल खाक झालेली होती. राजा मिश्रा यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता दिवाळीची पूर्वतयारी साठी सेल मध्ये मोठा स्टॉक असल्याची माहिती मिळाली त्यामध्ये त्यांचा 12 लाख रुपयाचा नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे . प्रत्यक्षदर्शी च्या सांगण्यानुसार आग विद्युत शॉर्ट सर्किट ने लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share