जि प शाळा कन्हाळगावचे शिक्षक जीवन आकरे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

देवरी 15: शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, गोंदियाच्या वतीने आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार कार्यक्रम २०२२ पार पडला असून देवरी तालुक्यातील कन्हाळगाव जिप शाळेचे शिक्षक जीवन आकरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी जिपचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील , जीप अध्यक्ष पंकज रहांगडाले , महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम , शिक्षणाधिकारी , गटशिक्षणाधारी यांच्या सह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा दुपारी २.०० वाजता जिल्हा परिषद सभागृह, गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता.

Print Friendly, PDF & Email
Share