राज्य रोजगार हमी योजना अमंलबजावणीसाठी कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक मान्यतेकरीता सक्षम अधिकारी नियुक्त करा : संजू उईके नगराध्यक्ष
देवरी 15: नगर पंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजना अमंलबजावणी करणेकरीता कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक मान्यतेकरीता सक्षम अधिकाऱ्यांना आदेशीत करणेबाबत देवरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संजू उईके यांनी नुकतेच जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदनातून मागणी केली आहे.
नियोजन विभागच्या , शासन निर्णय क्रमांक : मग्रारोहयो-2021/प्र.क्र. 55 / रोहयो 10 दिनांक 03/03/2014 आणि नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, शासन ज्ञापन क्रमांक : मग्रारो-2022/प्र.क्र.34/रोहयो-10 दिनांक 20/07/2022 नुसार
महाराष्ट्र “क” वर्ग नगर परिषद / नगरपंचायत क्षेत्र राज्य रोहगार हमी योजनेची अमंलबजावणी करणेकरीता कार्य पध्दती विहीत केलेली असुन रोजगार हमी योजने अंतर्गत देवरी या “क” वर्ग नगरपंचायतीच्या सन 2022-23 च्या वार्षिक कृती आराखडयातील वृक्ष लागवड 10 हजार झाडे कामांना मान्यता देण्यात आली आहे. सदर कामाची अमंलबजावणी मान्सुन काळात पुर्ण करणे अपेक्षीत आहे. त्याकरीता कार्यक्रम अधिकारी तसेच तांत्रिक मान्यतेकरीता सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करुन उपरोक्त कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश काढण्यात यावे अशी मागणी संजू उईके यांनी केली आहे.
सदर निवेदन देते वेळी संजू उईके यांच्यासोबत नगरसेवक पंकज सहारे आणि दिनेश भेलावे उपस्थित होते.