ओबीसी लोकांना योजनेचा लाभ देण्याकरीता निधी उपलब्ध करून द्या : सविता पुराम
देवरी 15: इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) लोकांना योजनेचा लाभ देण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी गोंदिया जिल्हाचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी नुकतीच सहकार ,इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदनातून मागणी केली .
एस.सी. आणि एस.टी. या प्रवर्गातील लोकांना महिला व बालकल्याण, समाजकल्याण प्रकल्पामधील इतर योजनेचा लाभ मिळतो. पण ओबीसी ला सदर योजनेचा लाभ मिळत नाही. त्याकरीता व्यक्तीगत लाभाच्या योजनेकरीता गोंदिया जिल्हयाला ५ कोटी रुपयाचा निधी देण्याबाबत सविता पुराम यांनी मागणी केली आहे.
याविषयावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सविता पुराम यांनी सांगितले.