ब्लॉसम स्कूल मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

देवरी: 14
ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुजित टेटे, हिंदी विभागाचे शिक्षक नितेश लाडे, संगीता काळे , सरिता थोटे , वैशाली मोहुर्ले आदी शिक्षक मंचावर उपस्थित होते. हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सुजित टेटे यांनी सकारात्मक विचाराचे महत्व पटवून दिले. सूत्रसंचालन आयुष घोडेस्वार सह अनिकेत मेश्राम यांनी केला व आभार प्रदर्शन गुंजन रोकडे यांनी मानला यांनी केला.

Print Friendly, PDF & Email
Share