गोंदियात शिवसैनिकांचा आ. अग्रवालांच्या कार्यालयावर हल्ला

गोंदिया: येथील अपक्ष आमदार आणि नुकताच मुंबई येथे भाजपला समर्थन जाहीर केलेले आमदार विनोद अग्रवाल यांच्या शहरातील जनसंपर्क कार्यालयावर आज दुपारी २ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी हल्ला चढविला. सदर प्रकार आमदार विनोद अग्रवाल यांच्या समर्थकांना माहीत होताच त्यांनी कार्यालय गाठले. यावेळी शिवसैनिक, पोलिस व आ. अग्रवाल यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच बचावाची झाल्याचे कळते. यानंतर हल्लेखोरांविरोधात शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी आमदार समर्थकांनी गर्दी केल्याचे वृत्त आहे.

Share