शा. औ. प्रशि. संस्था देवरी सत्र 2022 या सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतिने सुरु

शा. औ. प्रशि. संस्था देवरी सत्र 2022 या सत्राकरीता संस्थेतिल शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2022 सत्रातिल प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतिने करण्यात येत असुन खालील व्यवसाय शा० औ. प्राश. संस्था देवरी मध्ये उपलब्ध आहेत.

विजतंत्री, तारतंत्री , जोडारी ,मोटारगाडी, डिझेल, संधाता , शिवणकर्तन, शुइंग टेक्नोलॉजी, कास्मेटोलॉजी इ. व्यवसाय उपलब्ध असुन एस.एस.सी उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन प्रकिया पद्धतीने नोंदणी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य बी.एन.तुमडाम व संस्थेचे गट निदेशक एच. जे. नंदेश्वर यांनी सर्व उमेदवाराना आवाहन केले आहे.

तसेच संस्थेमध्ये शासकीय सुट्टीचे दिवसासह सकाळी 9.30 ते 5.30, वेळ मध्ये निशुल्क मार्गदर्शन करण्यात येईल. औ.प्र. संस्था देवरी येथे आदिवासी उमेद्‌वाराकरीता 75% टक्के जागा राखीव आहेत. तसेच प्रवेशित उमेद्‌वाराना 500/- निर्वाहभत्ता व वस्तीगृहात राहणारे उमेदवाराना 600/- निर्वाह भत्ता देण्यात येतो.

Print Friendly, PDF & Email
Share