पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू

तिरोडा: पोलिस स्टेशन येथे कार्यरत पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार 13 जून रोजी सकाळी 11.15 वाजता भंडारा येथे उघडकीस आली. दुलीचंद गोंदूजी बरवैया (49) असे मृतकाचे नाव आहे.

दुलिचंद हे सन 2016 पासून तिरोडा पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते. गत तिन महिन्यापासून ते गोंदिया जवळील बिरसी विमानतळ येथे कर्तव्यावर होते. ते त्यांच्या मूळ गाव भंडारावरून कर्तव्यावर येत असतांना भंडारा येथील राजीव गांधी चौकात त्यांच्या दुचाकीला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी केली आहे. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी व अराच आप्त परिवार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share