ब्लॉसम स्कुलच्या आयुष घोडेस्वार ची नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी साठी निवड

◼️ इयत्ता 9 वी साठी पात्र ठरलेला देवरी तालुक्यातील एकमात्र विद्यार्थी

देवरी 11: तालुक्यातील लोकप्रिय असलेल्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये केजी च्या वर्गापासून शिकत असलेल्या आयुष्य घोडेस्वार ची इयत्ता 9 वी साठी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत निवड झाली असून तो देवरी तालुक्यातील एकमात्र विद्यार्थी ठरला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षणासाठी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल ची ओळख आहे. दरवर्षी इयत्ता 5 वी च्या नवोदय परीक्षेमध्ये देखील येथील विद्यार्थ्यांची निवड होते. दर्जेदार शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात देखील ब्लॉसम च्या विद्यार्थ्यांनी तालुक्याचे नाव लौकिक केलेले आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षीच्या 10 वी च्या परीक्षेत देखील तालुक्यातून अव्वल येणाच्या मान ब्लॉसम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला होता. आदिवासी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत कमी नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आयुष च्या नवोदय परीक्षेतील यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे , वर्ग शिक्षक नितेश लाडे , शिक्षिका वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे यांच्या सह सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share