समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय लाखनीचा निकाल १०० टक्के

लाखनी- स्थानिक समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रगती सोपान पाखमोडे ही विद्यार्थिनी ८३.५० टक्के प्राप्त करून प्रथम तर लक्ष्मी पराग अतकारी ८५.१७ टक्के घेऊन द्वितीय व अथर्व अशोक गायधनी ८३८३ टक्के गुण घेऊन तृतीय स्थानी आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, सहकार्यवाह डेबूजी धांडे, संस्था संचालक मधुकर लाड, शिवलाल रहांगडाले व विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय मदाडे विज्ञान विभागाचे प्रा. श्रीकृष्ण पटले, प्रा. सतीश भोवते, प्रा. विभावरी निखाडे, प्रा. एकता जाधव, प्रा. लुटे, प्रा. प्रवीण पटले, प्रा. अंकित खेडीकर, प्रा. पूजा भदाडे, प्रा. मेघा धांडे, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share