देवरीच्या अतिदुर्गम भागातील अभिषेक परिहारची गगन भरारी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या 5 किमी मॅराथॉनमध्ये सुवर्ण पदक

◾️देवरीच्या विद्यार्थ्याने रोवला राजस्थानमध्ये विजयाचा झेंडा

प्राचार्य डॉ सुजित टेटे

देवरी 01: तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी नक्षरग्रस्त गोठणपार गावातिल अभिषेक परिहार याने नुकतेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स द्वारा आयोजित करण्यात आलेल्या 5किमी मॅरेथॉन मध्ये सुवर्ण पदक मिळविला असून देवरी तालुक्याचे नाव लौकिक केले आहे.

स्कूल स्पोर्ट्स एडुकेशन असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा 3 रे ओपन राष्ट्रीय स्कूल स्पोर्ट्स 2022 चे आयोजन राजस्थान येथील राजीव गांधी स्टेडियम नवासार जयपूर येथे घेण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये देवरी तालुक्यातील गोठणपार गावातील अभिषेक लोकचंद परिहार या बिए चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्रतिनिधित्व केले होते.

सदर स्पर्धेमध्ये अभिषेक परिहार यांने 50किलो वजन गटातून 5 किमी मॅरेथॉन मध्ये सुवर्ण पदक मिळविला असून त्यांचे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर , PSI शशिकांत शेंदाने, PSI बहकार , PSI नागरगोजे , API संदीप चव्हाण , PSI यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. अभिषेक च्या यशाबद्दल तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share