महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान करून केले अभिवादन

देवरी 14: येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सानेगुरुजी सभागृह जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे करण्यात आले व रक्तदान करुन महामानवाला अभिवादन करण्यात आले. सद्या विविध आजार असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रक्तपेढीसह खाजगी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा देवरी व बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदानास उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला . यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचा ही सहभाग होता .यावेळी देवरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना,सर्व कर्मचारी संघटना ,सामाजिक संस्था ,स्थानिक परिसरातील नागरिक यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य लाभले. या प्रसंगी रक्तदान केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा देवरी व बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी तर्फे रक्तदात्याचे आभार व्यक्त करण्यात आले.

Share