Sakoli: चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

साकोली: वाहक नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे . वडिलांच्या तक्रारींवरून साकोली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी राजेश ईश्वर मढावी याने ओळखीतल्या अल्पवयीन मुलीला नागपूर फिरविण्याच्या बहाण्याने सोबत घेतले आणि बस मध्ये बसवून घेतले.बस मध्ये वाहक नसल्याचा फायदा घेत तिच्यावर मागच्या सीटवर बलात्कार केला. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी माहिती घेतली असता मुलीला आरोपी राजेश ईश्वर मढावी सोबत घेऊन गेल्याचे समजले. पोलिसांना आरोपी मुलीला घेऊन बोदरा येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचेवर पोस्को सह 8 विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share