डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरी 13:- येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन सानेगुरुजी सभागृह जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. रक्तदान करुन महामानवाला अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे. सद्या विविध आजार असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रक्तपेढीसह खाजगी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा देवरी व बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.तरी इच्छुकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग ह्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा देवरी व बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन देवरी तर्फे करण्यात आले आहे.

Share