भदंत राहुल बुद्ध विहार सांस्कृतिक समिती परसटोला येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

परसटोला 12: स्थानिक भदंत राहुल बुद्ध विहार सांस्कृतिक समिती येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची 195वी जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमित्तानं मंचकावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य महेंद्रजी मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून मा.विलासजी शिंदे, मा.भारतजी खोब्रागडे ,प्रा. प्रदीप रामटेके ,मा. सुरेश मेश्राम उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शिक्षणाचे महत्व पटवून देणारे एक पथनाट्य सादर करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश लाडे व आभार प्रा. प्रदीप रामटेके सर यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share