मोटरसायकलचा टायर फुटल्याने पोलीस जवानाचा भीषण अपघात

देवरी 12: आमगांव मार्गावरील वडेगाव येथे मोटरसायकलचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला असून मोटरसायकल चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हाताला व पायाला जबर मार लागला आहे.

भारतीय राखीव पोलीस दलातील (IRPF) जवान विनोद डोये रा. पदमपुर ता. आमगाव जि. गोंदियायेथील असुन आपल्या भावाच्या लग्न कार्ये पार पाडण्यासाठी दोन दिवसा अगोदर पदमपूर या गावी आले होते. भावाच्या लग्नकार्य आटपून नोकरीवर रुजू होण्याकरीता मगरडोह (चिचगड) पोलिस कॅप करीता निघाला असता देवरी – आमगाव महामार्गावरील वडेगाव येथे मोटरसायकलचा (MP-50 MG 7986) टायर फुटल्याने पोलिस जवानाचा गाडीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडला.

वडेगाव येथील गावकऱ्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला बोलवून ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने बजाज हॉस्पिटल गोंदिया येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share