दिलासादायक…महाराष्ट्र कोरोना मुक्तीच्या दिशेने

मुंबई: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आला कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. पुन्हा एकदा चीन, युरोप खंड आणि फ्रान्समध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येतेय. त्यामुळे जगभरातल्या देशांना भीती वाटत आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातून एक दिलासादायक बातमी समोर येते आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर महत्त्वाच्या भागात मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. काल म्हणजेच शनिवारी राज्यभरात केवळ 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आरोग्य विभागानं ही माहिती दिली. सर्वांत दिलासा देणारी बातमी म्हणजे, राज्यात असे 19 ठिकाणं आहेत जिथे एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

या ठिकाणी एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही

ठाणे

उल्हासनगर

भिवंडी

निजामपूर मनपा

मीरा भाईंदर मनपा

वसई विरार मनपा

पनवेल मनपा

मालेगाव मनपा

धुळे

धुळे मनपा

जळगाव

जळगाव मनपा

नंदूरबार

सोलापूर

कोल्हापूर

सांगली

सांगली मिरज कुपवाड मनपा

सिंधुदुर्ग

रत्नागिरी

Share