चिचगड: सिंगणडोह-राणीडोह परिसरात पोलीसांच्या गोळीबारात संदिग्ध जखमी?

चिचगड: गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सिंगणडोह पोलीस आउटपोस्टमधील राणीडोह जंगलपरिसरात पोलीस गस्तीवर असताना जंगलात काही संशयीत व्यक्ती दिसल्याने त्यांच्यासोबत झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीला जखमी केल्याचे वृत्त समोर येत आहे.ही चकमक नक्षल्यासोबत आहे की जंगलात शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या संदिग्धांसोबतची याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसून पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share