छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ” संत गाडगेबाबा जयंती साजरी”

देवरी 23: छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे वैराग्य मुर्ती ” संत गाडगेबाबा जयंती” साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री एम जी भुरे प्राचार्य हे होते तर प्रमुख अतिथी मा श्री एम आर तांडेकर होते.

यावेळी प्रथमतः संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्या बद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस टी मेश्राम सर यांनी केले तर सूत्रसंचालन कु श्रृती शाहारे हिने केले तर आभार प्रदर्शन तेजस नाकाडे याने मानले. अशाप्रकारे या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share