जय शिवराय
✍?सुदर्शन एम. लांडेकर, देवरी
भगव्या झेंड्याची चमक बघ
भगव्या झेंड्याची धमक बघ,
भारताची शान आहे..
घाबरतोस काय कोणाला,
तुझा बाप शिवबाच आहे…
जय शिवराय …………
शेवटच्या स्वासापर्यंत प्रत्येक नसानसात
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.
जय शिवराय………..
शपथ आहे भवानीची माझ्या शिवबाला
विसरेल ज्या दिवशी,
राख होईल शरीराची त्या दिवशी
माझी राख सांगेल ही राख आहे एका_शिवभक्ताची
जय शिवराय…………..
तलवार चालवत होता विजेसारखी
परस्त्री ला मातेसमान मानणारा
वाघ नख्याने अफजलखानाचा वध करणारा ,
स्वर्गात गेल्यावर माझ्या राज्याला देवांनी झुकून मुजरा केला,
असा मर्द मराठा माझा राजा शिवबा होऊन गेला
असा मर्द मराठा माझा राजा शिवबा होऊन गेला.
जय शिवराय………….