देवरीत उत्साहात साजरी होणार संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी

◾️पुण्यतिथी प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन

देवरी 18 : सोनार समाज शाखा देवरी च्या वतीने उद्या १९ फेब्रुवारी रोज शनिवारला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पुण्यतिथी उत्सव कार्यक्रम देवरी येथील सोनार समाज भवन येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सकाळी 9 वाजता ज्योत प्रज्वलन , ज्ञानचिंतन तर सकाळी 10 वाजता महिलांचे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम,11 वाजता भजन कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रम , सोनार समाजातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी 4 वाजता पुण्यतिथी उदघाटन सोहळा सुरू होणार असून उदघाटक म्हणून देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे, अध्यक्ष म्हणून जिप सदस्य संदीप भाटिया , प्रमुख अतिथी फावीन्द्र हाडगे, मनोहर उदापूरे , ताराचंद निनावे , मधुकर येरपुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सोनार समाजातील वर्ग १० व १२ वि मधील २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यर्थिनींचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गितगायन स्पर्धा, तसेच २ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता भजन, पूजन, गोपालकाला तर सायंकाळी ६ वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला सोनार बंधू -भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोनार समाजाचे अध्यक्ष सुखदेव काळबांधे, सुभाष दुबे , अनिल कुर्वे , प्रमोद रोकडे , दिलीप रोकडे , महिला अध्यक्ष कमला मस्के ,युवा अध्यक्ष जयेश मस्के , तसेच सोनार समाज कार्यकारिणीने केले आहे.

Share