देवरीच्या रोहित ब्राह्मणकर ची वायुसेनेत निवड

◾️योग प्रशिक्षक म्हणून बनविली ओळख

प्रा.डॉ. सुजित टेटे
देवरी 10: तालुक्यातील दिन बंधू विकास संस्था अंतर्गत असलेल्या वाचनालयातील नियमित अभ्यासक तसेच योग प्रशिक्षक रोहित ब्राह्मणकर याची वायुसेनेमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ मध्ये निवड झाली आहे.

देवरी येथील योग अकॅडमी मध्ये योग प्रशिक्षनासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवून वायू सेनेत आपली जागा बनविणाऱ्या रोहित ने युवा पिढीला मोलाचा संदेश दिला आहे. सदर यशाचे श्रेय त्याने आपले आई वडील , भाऊ , शिक्षक , मित्रमंडळी यांना दिले.

Print Friendly, PDF & Email
Share