गोंदियात 150 रुग्णांची कोरोनावर मात
गोंदिया 31: महिन्याच्या सुरुवातीला सातत्याने वाढणार्या कोरोना बांधितांमुळे चिंता वाढली होती. मात्र महिन्याचा शेवट दिलासा देणारा ठरत आहे. आढळणार्या रुग्णांमध्ये घट होत असून बरे होणार्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज, 31 जानेवारी रोजी 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता 1292 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
आज झालेल्या एका रुग्णाच्या मृत्यू आतापर्यंत कोरोनामुळे 585 कुटूंबांनी आपला आप्तस्वकीय गमावला आहे. आता गोंदिया तालुक्यात 376, तिरोडा 182, गोरेगाव 64, आमगाव 121, सालेकसा 71, देवरी 117, सडक अर्जुनी 163 व अर्जुनी मोर तालुक्यात 198 कोरोना बाधित उपचार घेत आहेत.