गोंदिया जिल्हाचे महेंद्र मोटघरे नवे प्रभारी शिक्षणाधिकारी
गोंदिया 31: पंचायत समिती देवरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांना गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी के.वाय.सर्याम हे आज(दि.31)वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर महेंद्र मोटघरे यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या आदेशावरून मोटघरे यांनी पदभार स्विकारला आहे. सदर पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.