सिरपुरबांध येथे नवीन प्रवाशी निवाऱ्यांचे भूमिपूजन

■ आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

देवरी :आमदार सहषराम कोरोटे यांच्या पुढाकाराने प्रवाश करणाऱ्या लोकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता देवरी तालुक्यातील सिरपुरबांध येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन एस.टी. बस स्टैंड च्या नवीन प्रवाशी निवाऱ्यांचे भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी नवनिर्वाचित पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, सिरपुरचे सरपंच नितेश भेंडारकर, उपसरपंच विनोद वरखडे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, तंटामुक्ति समितीचे अध्यक्ष कुशन शिवनकर, पोलिस पाटिल, नरेश शिवनकर, माजी सरपंच नरसिंग फटिंग, ग्रा.पं.सदस्य योगराज शिवनकर, इंदूबाई मेंढे, कलाबाई धुर्वे, शेवन्तीबाई फुलकुवर, तसेच प्रतिष्ठित नागरिक शालिकराम कोसरकर, राधेलाल पटले, नितीन कोसरकर, कृष्ना ब्राम्हणकर, उमेन्द्र मेश्राम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share