गोंदिया: 354 नवे कोरोना रुग्ण, 168 स्वस्थ

गोंदिया 22: जिल्ह्यात आज, 22 जानेवारी रोजी एकाच दिवशी दुपट्टीपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. आज 354 नवीन रुग्ण आढळले असून 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता 1348 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहे.

डिसेंबर महिन्यात एक आकडी Corona रुग्ण संख्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने वाढत आहे. मागील आठवड्यात नियमीतपणे तीन आकडी रुग्ण आढळत असून आज, 22 जानेवारी रोजी घेतलेल्या 1322 कोरोना चाचण्यांमध्ये 21 जानेवारी रोजी आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा दुप्पट 354 रुग्ण आढळले. तर 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी आता 1322 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक 731, तिरोडा 67, गोरेगाव 64, आमगाव 114, सालेकसा 88, देवरी 25, सडक अर्जुनी 64 व अर्जुनी मोर तालुक्यातील 193 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य प्रशासनासह जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरु असून आतापर्यंत पहिला डोस 91.21 टक्के, दुसरा 68.04 टक्के तर 15 ते 18 वयोगटातील युवकांचे 61.77 टक्के लसीकरण झाले आहे. ही सकारात्मक बाब असली तरी वाढता कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी आता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे झाले आहे.

Share