मतदान झाले आता विजयाच्या चर्चेला उधाण, रंगतात अंदाजी टोलेबाजी

देवरी 23: जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगरपंचायती साठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी बघता विजयाची समीकरणे बऱ्याच ठिकाणी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्या क्षेत्रातून कोणता उमेदवार बाजी मारेल याची उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार चर्चा आणि विजयाचा अंदाज बांधणे सुरु झाले आहे.

देवरी तालुक्यातील विविध क्षेत्रात झालेल्या निवडणुकीसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जि प आणि पंचायत समितीचा निकालावर विधान परिषदेवर निवडणुकीचा मार्ग सुकर होणार आहे त्यामुळे सर्वांनी या निवडणुकीवर जोर लावलेला दिसून आला. अखेर 19 जानेवारीला कुणाचे अंदाज आणि टोले खरे ठरतात हे कळणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share