मुंबई: पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला ईडीनं समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी ही माहिती दिली. भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
प्रवर्तन निदेशालय(ED) ने एक मामले में अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन को समन किया: सूत्र
— ANI_HindiNews (@AHindinews) December 20, 2021
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/0MCkDL9v8p
एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश करण्यात आला होता. दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होते. तेव्हा ईडीने याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.








