धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

◾️देवरी येथील मनोहरभाई पटेल पटेल येथील 12 व्या वर्गातील विद्यार्थी , परिसरात शोककळा

देवरी 10: देवरी येथील मनोहरभाई पटेल शाळेतील 12 वी वर्गात शिकत असलेल्या सुनील मांढरे या विद्यार्थ्यांचा आज (10) सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार सदर विद्यार्थी देवरी तालुक्यातील भर्रेगाव परिसरातून आपल्या बहिणी सोबत व एका मैत्रिणी सोबत दुचाकींनी येत असतांना महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सोबतच्या दोन्ही विद्यार्थिनी ची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी त्यांना गोंदियाला हलविल्याचे वृत्त आहे.

वृत्त लिहीत पर्यंत गुन्हा नोंद झालेला नाही . सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share