धक्कादायक ! महिला पोलीस कॉन्स्टेबल ची आत्महत्या

सालेकसा 10: स्थानिक पोलीस स्टेशन येथे कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबलनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.9 ला घडली. ज्योती बघेले (29) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल चे नाव आहे. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन सालेकसा येथे करण्यात आलेली आहे.

सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत ज्योती बघेले हि गावातील भाड्याच्या घरात राहत होती. तिचे पती सुद्धा सी 60 कमांडो पथकात कार्यरत आहेत. आत्महत्या मागचे कारण निश्चित कळले नसून सदर घटनेची परिसरात चर्चा सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share