◆गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांचे आव्हान.
देवरी, ता.२७: आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणूक होणार आहे. या पाश्वरभूमीवर ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढेल आणि अभूतपूर्व यशसंपादण करेल असा मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे माझ्या शिवसैनिकांनी येथील नगरपंचायतचे सफाई कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून देण्याकरिता व देवरी शहराला सुंदर विकसित करून या शहराचा कायापालट करण्यासाठी या नगर पंचायत वर भगवा फडकवा असे आव्हान गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश धुमाळ यांनी केले.
श्री धुमाळ हे देवरी येथील सौम्य जीम हॉल येथे शनिवार(ता.२३ ऑक्टोम्बर) रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या बैठकीत शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, जिल्हा समन्वयक सुनील लांजेवार, आमगाव देवरी विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा, शिवसेना महिला आघाडीच्या गोंदिया जिल्हा संघटक करूणा कुर्वे, माजी उपसभापती गणेश सोनबोईर यांच्या सह तालुक्यातील शिवसैनिक महिला, पुरुष व युवक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हासह तालुक्यात शिवसेना सर्व निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढेल व यात अभूतपूर्व यश संपादन करेल तसेच मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित असल्याच्या विश्वास ही व्यक्त करण्यात आला आणि येथील नगरपंचायतींचे सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याविषयी ही चर्चा करण्यात आले.
या प्रसंगी मुकेश शिवहरे, सुरेंद्र नायडू, सुनील लांजेवार, ललित मुथा यांनी ही बैठकीत आपले विचार मांडले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या देवरी शहर संघटिका पदावर ममता शर्मा यांची निवड करण्यात आली.
या बैठकीच्या आयोजनाकरिता तालुका संघटिका प्रीती उईके, उपसंघटिका सलमा पठाण, सारिका आयतुलवार, कृष्णा राखडे, दालचंद्र मडावी व सरिता हाडगे आदींनी सहकार्य केले.








