देवरीचे काँग्रेस कार्यकर्ता नर्मदाप्रसाद शर्मा यांचे निधन

देवरी, ता.२७: देवरी येथील रहवासी तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ता नर्मदाप्रसाद शर्मा वय ७९ वर्ष यांचे आज बुधवार(ता.२७ ऑक्टोम्बर) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी दुःखद निधन झाले यांना हृदय विकाराचा त्रास होता.
यांच्या मागे पत्नी, मुलगा व सुन असा आप्त परिवार आहे. यांच्यावर आज दुपारी १ वाजेच्या सुमारास देवरी येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी कॉग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, समाजबांधव व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित राहून मृतकाला श्रद्धांजली अर्पण केले.

Share