नक्षलवाद्यांच्या नावाने डॉक्टरकडून खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक
मुंबई : क्राईम ब्रांन्चने एका महिलेला अटक केली आहे. या महिलेला अटक करण्यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नक्षलवाद्यांच्या नावाने धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. या महिलेने एमबीबीएस डॉक्टरला नक्षलवाद्यांच्या नावाने पत्र पाठवून पैशांची मागणी केली होती. अटक करण्यात आलेल्या महिलेने एमबीबीएस डॉक्टरला नक्षलवाद्यांच्या नावाने पत्र पाठव ले होते. या पत्रात आरोपी महिलेने 50 लाखांची मागणी केली होती. डॉक्टरला लाल सलाम या नक्षलवाद्याच्या नावाने खंडणीचे पत्र पाठवले होते.
या पत्रात या महिलेने खंडणी न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. खंडणी न दिल्यास डॉक्टरची आणि त्याच्या मुलाची हत्या करण्याची धमकी पत्रात देण्यात आली होती.
मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने महिला आरोपी आणि मुख्य सूत्रधार व्यतिरिक्त आणखी एकाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यूट्यूब बघून डॉक्टरला लुटण्याचा प्लान करण्यात आल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.