वज्रघाताने देवरीत घराचे आणि इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान

देवरी 30: पावसाने काल दुपारी देवरी परिसरात दमदार एन्ट्री मारली असून परिसरात जोरदार विजांच्या गडगडाटीसह पावसाचे आगमन झाले. यावेळी घरावर वीज पडून सुरभी चौक येथील गौतम यांच्या घराचे नुकसान झालेले आहे.

सविस्तर वृत्त असे कि देवरी परिसरात काल (29) दुपारी 4:00-4:30 च्या सुमारास विजांच्या गडगडाटीसह जोरदार पाऊस पडले. यावेळी देवरीतील सुरभी चौकातील अजय कमलदास गौतम यांच्या घरावर वीज पडून भिंतीला छिद्र झाले असून विजेरी उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान इलेक्ट्रिक बोर्ड , 3 सर्किट , बल्ब , 5 पंखे , संपूर्ण वायरिंग , dth आदी वस्तूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून घराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते.

Print Friendly, PDF & Email
Share