‘बचपन का प्यार’मुळे रातोरात स्टार झालेल्या सहदेवला MG ने गिफ्ट केली २३ लाखांची कार? जाणून घ्या सत्य

बचपन का प्यार फेम सहदेवला भेट म्हणून कार देण्यात आल्याचं सांगत काही फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने यासंदर्भात एक महत्वाचा खुलासा केलाय.

छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेव या गाण्यामुळे रातोरात स्टार झालाय. फोटो सोशल मीडियावर viral झाला आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर एक गाणं तुफान व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील किंवा अल्बममधील गाणं नसून एका लहान मुलाने गायलेलं गाणं असून गाण्याचं नाव आहे, बचपन का प्यार. छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेव नावाचा मुलगा या व्हायरल गाण्यामुळे रातोरात स्टार झालाय. इंटरनेटवर सहदेवच्या या गाण्याने धुमाकूळ घातलाय. या गाण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडमधील गायकांपर्यंत अनेकांनी सहदेवचं कौतुक केलं आहे.

मात्र आता एमजी या ब्रिटीश कार निर्माता कंपनीनच्या एका शोरुमने या गाण्यासाठी सहदेवला २१ हजारांचा एक विशेष धनादेश दिलाय. एमजीने सहदेवचं त्याच्या गाण्याच्या कौशल्यासाठी विशेष कौतुक करत हे बक्षिस दिलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवर सहदेवला एमजीने २३ लाखांची गाडी भेट म्हणून दिल्याचं व्हायरल होत आहे. सहदेवला भेट म्हणून कार देण्यात आल्याचं सांगत काही फोटो व्हायरल झाले आहेत. खरोखरच एमजीने सहदेवला २३ लाखांची गाडी भेट दिलीय का यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच याबद्दलचा मोठा खुलासा कंपनीने केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share