Naxalites विरुद्ध गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई

गोंदियातील 6 अटकेत : नक्षल्यांना साहित्य पुरवठा प्रकरणात आरोपींची संख्या 13

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून Naxalites आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात करीत आहेत. त्या भागात नक्षल कारवाया करणार्‍या नक्षल्यांना साहित्य पुरवठा करताना गेल्या आठवड्यात 8 व्यक्तींना किरनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता. त्यातच या प्रकरणाचा तपास करतानाच किरनापूर पोलिसांना आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर गोंदिया येथील वचन विजय खंडारे याला 9 जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यापूर्वी 8 जुलै रोजी किरनापूर तालुक्यातील बोरबन येथील निवासी वरजूर गणपत उईकेला ताब्यात घेत चौकशी सुरु केली असून या नक्षल साहित्य पुरवठा प्रकरणात आरोपींची संख्या 13 झाली आहे. तर बालाघाट पोलिसांनी याच प्रकरणात चौकशीकरिता गोंदियातील एका माजी नगरसेवकासह 2 व्यक्तींना अटक केली असून गोंदियातील 6 व्यक्ती या प्रकरणात अटकेत आहेत.

Naxalites ph2

नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. छत्रसाल उर्फ बंटी मोहन बानेवार (४८) रा. माडी मोहल्ला चावडी चौक छोटा गोंदिया, लक्ष्मीनारायण उर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३) रा. साई खापर्डे कॉलनी कुडवा व राजेश गोपीचंद पाटील (५१) रा. आंबेडकर चौक कुडवा या तिघांना अटक केली आहे.

नक्षलवाद्यांना शस्त्र पुरविणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. त्या घटनेचे धागेदोरे गोंदियापर्यंत लागले. त्यावेळी गोंदियातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गोंदियातील आणखी तिघांना नक्षल समर्थक म्हणून अटक करण्यात आली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या किरनापूर-किनी जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्याजवळून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके ४७, आठ मोबाईल, चारचाकी असलेले दोन वाहने, एलईडी टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, कापड भरलेल्या तीन बॅग असा सामान जप्त करण्यात आला होता. नक्षलवाद्यांना पावसाळ्यापूर्वी ५ हजार काडतुसे, पिस्तूल, शस्त्रे दारुगोळा, शिबीर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यातील ३० लाख रुपयाचे सामान मागील सहा महिन्यात नक्षलवाद्यांना पुरविल्याची माहिती आहे. या प्रकरणात नक्षल समर्थक म्हणून काम करणाऱ्या गोंदियातील तिघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षल विरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पीएसआय उके यांनी केली आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीच्या सुचनेवरुन लपवून ठेवण्यात आलेल्या साहित्यासह 1 बंदुक व 490 काडतूस चौकशीदरम्यान हस्तगत करण्यात आले आहे. तर बोरबन जंगल परिसरातून हे साहित्य नक्षल्यापर्यंत पोचविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

Share