GONDIA BREAKING: बोगस डॉक्टरची देवरीच्या आदिवासी तरुणीवर शस्रक्रीया, तरुणीचा मृत्यू
▪️शस्त्रक्रिया परवाना नसतानाही बोगस डॉक्टरने केली दहा हजारात चक्क डोक्याची शस्त्रक्रिया बोगस भोंदू डाँक्टरावर पोलिसात गुन्हा दाखल बोगस डॉक्टराला अटक
साखरीटोला 8: एका बोगस डाँक्टरने फक्त दहा हजार रूपयात एका तरूणीची डोक्याची शस्त्रक्रिया केल्याने तरूणीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे घडला आहे. या प्रकारामुळे गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेला बोगस डाँक्टरांचा सुळसुळाट समोर आली, मृतक तरूणीचे दमयंती सुरजलाल धुर्वे असे नाव असून समीर राँय बोगस डा़ँक्टराचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की , साखरीटोला येथे डॉक्टर समीर रॉय हे डॉक्टरीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे देवरी तालुक्यातील मुरदोली येथील दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील भागात गाठ होती त्या गाठीवर डॉक्टर राँय यांनी कोणतीही परवानगी किंवा शस्त्रक्रियाचे कोणतेही ज्ञान नसतांना 10 हजार रुपये घेवून शस्त्रक्रिया केली.
दुसऱ्या दिवशी तरूणीला उलट्या सुरू झाल्या पण गॅसेसची समस्या असेल असे सांगून टाळले मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यावर गोंदियातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.तक्रारीवरून बोगस डाँक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. सालेकसा पोलिसांना बोगस डॉक्टरांला अटक करून पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.