चिचगड 23- देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढासगड जंगल परिसरात एका अनोळखी महीलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार अंदाजे २० ते २२ वर्षे वयाच्या महिलेचे मृतदेह ढासगड जंगल परीसरात मिळून आले असून तिच्या गळ्यावर धारदार हत्याराने मारल्याचे असून ति उजव्या पायाने अपंग आहे. उजव्या कानात बाजारू झूमका, पायात बाजारू पायल, पायात जूडवी, अंगात शेंदरी रंगांची कूर्ती, निळ्या रंगाची लॅगीन , जांभळी रंगांची घड्याळ ,दोन काळ्या पांढरे रंगांचे शूज कोणत्यातरी असून अज्ञात समांनी जंगलात मारून फेकले आहे. कुणाला माहिती मिळाली असल्यास पोलीस स्टेशन चिचगड ला 87667 49967 या नंबर वर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे . तपास चिचगड पोलीस करीत आहेत .








