Breaking नागपूर: एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या
वृत्तसंस्था नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अलोक माथुरकर असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अलोक माथुरकर यांने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे.
अलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
अलोक हे टेलरिंगचे काम करायचे. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.