पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे वृक्षारोपण
?लोहारा येथे वृक्षारोपण करून भगवा सप्ताह ची सुरुवात
देवरी 13: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिवसानिम्मित्त शिवसेना भगवा सप्ताह साजरा करीत आहे. याचे औचित्य साधून शिवसेना तालुका देवरी तर्फे लोहारा येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे .
शिवसेने तर्फे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिम्मित भगवा सप्ताह साजरा होत असून यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष करून वृक्षारोपन , नवीन सदस्य नोंदणी अभियान तसेच नवीन लोकांचे पक्षप्रवेश यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी माध्यमांना दिली.
सदर कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले असून यावेळी शिवसेना युवा सेना तालुका अधिकारी दिलीप बघेल , नितीन दुबे , अभिषेक परिहार , नागेश परिहार , प्रमोद बघेल , दुर्गेश शेंडे , देवचंद अगळे , माधव मेश्राम , प्रणय बावनकर , सचिन दुबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वानी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.