मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ₹१० ने स्वस्त पेट्रोल

?मनसे सालेकसा यांच्या तर्फे तालुका वासीयांसाठी वाढदिवसाचा उपहार

राकेश रोकडे
प्रतिनिधी / सालेकसा
: मराठी हृदयसम्राट मनसे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सालेकसा यांच्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे सालेकसा अध्यक्ष सौ. उषा अभय कुरंजेकर व मनसे तालुका सचिव अमित अग्रवाल यांच्या संकल्पनेने, वाढत्या पेट्रोलच्या किंमतीच्या निषेधार्त महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे निषेध नोंदवत तालुक्यातील जनतेला ₹१० रुपये प्रति लिटर पेट्रोल स्वस्त देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमातून तालुक्यातील नागरिकांना दहा रुपयांनी स्वस्त पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जून रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजता पर्यंत सालेकसा येथील क्षिरसागर पेट्रोल पंप येथे ₹१० रुपयाने स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे. यासाठी सालेकसा बस स्थानक येथे मनसेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मंडपातून कुपन चे वितरण केले जाणार आहे. कुपन वितरण सकाळी 11.00 ते 2.00 दोन वाजता पर्यंत करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले नाव नोंदवून बस स्थानक येथून कुपन प्राप्त करून त्या कूपन्सच्या आधारावर ₹१० रुपये कमी किमतीचे पेट्रोल विकत घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे कुपन ची कालावधी 14 जून सायंकाळी पाच वाजता पर्यंतच असणार आहे.

केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या कर आकारणीमुळे पेट्रोलचे भाव शंभरी पार झाले आहे. याचा निषेध करत व राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त पेट्रोल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्ष सौ. उषा कुरंजेकर व मनसे तालुका सवंगीव अमित अग्रवाल यांनी दिली आहे.

सालेकसा तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, उपाध्यक्ष अभय कुरंजेकर, दिलीप ढेकवार, ध्रुवकुमार हुकरे, सालेकसा शहर अध्यक्ष राहुल हटवार, शहर उपाध्यक्ष गोल्डी भाटिया यांनी केले आहे.

Share